भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.
वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रीय पदार्थ आपणास ओळखता येतात, पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.
ह्युमसची व्याख्या
ह्युमसची व्याख्या खनिज जमिनीत चांगल्याप्रकारे कुजलेला कमी अधिक स्थिर असलेला सेंद्रीय पदार्थाचा भाग अशी करतात. हा सेंद्रीय पदार्थ कोलोईडल (colloidal) असतो. त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. त्यामध्ये सेंद्रीय स्वरुपात मूलद्रव्ये असतात. मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक असतात. इतर मूलद्रव्ये कमी प्रमाणात असतात. झाडाचे लिग्नीनपासून मोठया प्रमाणात ह्युमस तयार होतो.जमिनीतील जिवाणू ह्युमसमध्ये राहातात. त्याचे शरीर बांधणीसाठी ह्युमसचा उपयोग होतो. सेंद्रीय पदार्थाचे ह्युमसमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ह्युमीफिकेशन म्हणतात.
Thursday, July 7, 2011
Wednesday, June 29, 2011
श्रमि श्रमला श्रीरंग....!
FACEBOOK POST BY SANJAYSINH GAMBHIR
भक्ती-सेवा सप्ताहाच्या `वो सात दिन` भावनेतून कोणीही पुण्यातील श्रद्धावान बाहेर आलेले नव्हते किंबहुना कोणालाच बाहेर पडायचेच नव्हते. अशा स्थितीत `गोविद्यापीठम` सेवा जाहीर झाली.कितीजण सेवेला येतील कोणीही अंदाज बांधू शकत नव्हतं..आपण सामान्यच,कारण `त्याचा` अंदाज कोणाला असणार ? `त्याचा` अंदाजच निराला हेच खरं ...कारण इतिहास घडवला `त्यानं`..! तब्बल आठ बसेस,खाजगी वाहने आणि रेल्वे असं मिळून जवळपास 500 भक्त-कार्यकर्ते सेवेस उपस्थित...!
नुकताच झालेला भक्ती-सेवा सप्ताह आता mega सेवांचीच सवय करून गेलाय की काय ?
गोविद्यापिठमच्या प्रांगणात प्रवेश केला आणि जाणवू लागलं ते बापू. नंदाई अन सुचितदादाचं अस्तित्व...अगदी ठळकपणे ! स्वप्नीलसिंहांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि थोड्याच वेळात सेवाकार्य सुरु झालं..
अनावश्यक तण काढण्यापासून बंधारा बांधण्यापर्यंत विविध प्रकारच्या सेवांचा समावेश या सेवाकार्यात करण्यात आला होता.
वय वर्षे 5 ते 85 या वयोगटातील सर्व श्रद्धावानांनी उत्साहात आपापल्या शारीरिक कुवतीनुसार या सेवेत सहभाग घेतला.
गोविद्यापिठमच्या प्रत्येक झाडातून,प्रत्येक पानातून आपला बापू आनंदी चेहऱ्याने सर्वांकडे पाहत होता...नेहमीसारखाच..! तो आपल्याकडे पाहतच असतो. आपण त्याला पाहतो का हे महत्वाचे...प्रत्येक सेवेत असा अनुभव येतो की कामाची सवय नसलेल्या आम्हाला इतकं काम करून थकवा कसा येत नाही ? याचं उत्तर एकच...बापू करितो आमुची सेवा ! तो आपला सर्व थकवा स्वतःकडे घेतो,तो दमतो म्हणून आम्ही विना थकवा राहतो..!हा भाव नाहीये मित्रांनो, सत्य आहे...!! म्हणून आपण `मी सेवा केली `असे न म्हणता `हे बापुराया, मी तुझा शतशः ऋणी आहे, तू मला ही संधी दिलीस` असं म्हणायला हवंय.
बापूकार्यात एक फायदा असतो,मित्रांनो,आपल्या मनातील जाळी-जळमटे, शंका-कुशंका, तर्क-कुतर्क, रुसवे-फुगवे, पोकळ अहंकार या सर्वांना मूठमाती दिली जाते. तशी व्यवस्था बापू यंत्रणेत आहे.पण कधी ? आपण काही करतोय हा विचार येऊ दिला नाही तर.. बापू विश्वनियंता आहे,सर्वव्यापी,सर्वज्ञ आहे. तरीही आपल्या छोट्याशा चांगल्या कृतीचं त्याला खूप कौतुक आहे.
खरं तर त्यानं कौतुक करावं असं खरंच आपण काही करू शकत नाही. भल्या-भल्या ऋषी-मुनींना हजारो वर्षे तपश्चर्या करूनही जो दुष्प्राप्य तो आम्हांस जर खरोखर काहीही न करता लाभला आहे तर आम्ही त्याला हवं तसंच वागायला हवं...!
विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा विष्णू व्योमकेशी I
धरिला वेष तू मानुषी I भक्तजन तारावया II
याचं स्मरण आपण कायम ठेवायला हवं.
आपल्या जीवनातील तण (कुविचार) आणि ताण काढण्यापासून ते जीवनाला मर्यादेचा बंधारा बांधण्याचं काम बापू अखंडपणे करत आहेत. आपण चुकतच राहतो,चुका करतच राहतो, बापू मात्र आपल्यासाठी राबतच राहतो,श्रमतच राहतो ..आपल्या चुकांना क्षमा करून !
आपलंआता कर्तव्य आहे की बापूंना आपल्यामुळे सदैव आनंदी ठेवणं...आपल्या रागाचा अनुराग झाला की आपल्या अरंग जीवनात पांडुरंग प्रकटविण्यासाठी तो
अनिरुद्ध श्रीरंग समर्थ आहे....!!!
Tuesday, June 28, 2011
सेंद्रिय शेती व प्रकियांचे मुख्य उद्देश
सेंद्रिय शेती आणि प्रक्रियापध्दती अनेक मुलतत्त्वांवर व कल्पनांवर आधारित आहे.
पुरेश प्रमाणात उच्च पौष्टिक दर्जा असलेले खाद्यान्न उत्पन्न करणे.
निसर्गाची निश्चित प्रणाली व कालचक्र आपल्या क्रियांनी अधिक संपन्न होईल असे विधायक कार्य करणे.
शेतीतील सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राणीजात यांचा जीवचक्राची वाढ होण्यास प्रयत्नशील असणे.
जमीनीची सुपीकता वाढवून सुक्ष्मजीव व प्राणीजात याचा निर्वाह / प्रतिपाळ करणे.
पाण्याचा योग्य वापर व जलाचरांचे संवर्धन करणे.भूमी व जल यांचे संरक्षण करणे.
शक्यतो ज्याचे नुतनीकरण होऊ शकेल असे शेतीतील घटक व उपलब्ध स्थानिक आवश्यक घटकांचा आधार घेवुन सेंद्रिय शेतीची जुळणी करणे.
सेंद्रिय पदार्थ व पोषक द्रव्ये यांचे शेतीतील नियमन करतांना शक्यतो सेंद्रिय शेतातीलच किवा स्थानिक सेंद्रिय पदार्थाचा उपयोगाने एकत्रित मिळतील अशी व्यवस्था करणॆ.
सेंद्रिय शेतीत प्रयुक्त होणारा कच्चामाल आदी पुन: वापर किवा नुतनीकरण करता येण्याजोगा असावा.
सर्व पाळीव प्राण्यांचे नैसर्गिक व्यवहार कायम राहील अशी परिस्थिती असावी.
शेती पध्दतीतून निर्माण होणारे सर्व प्रकारचे प्रदुषण कमी होईल याची काळजी घ्यावी.
शेती, परिसरातील वनस्पती ,उपयोगी गुरे व वन्यप्राणी यांच्यातील अनुवंशिक विविधतेचा साभाळ करणे.
देशी बि-बियाणे, धनधान्याच्या जाती व प्राण्यांच्या जाती यांची जोपासना व वाढ करून त्या विषयाचे देशी व पारंपारिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे.
सेंद्रिय उत्पादन व प्रक्रियेत समाविष्ट असणा-या सर्वाना दर्जेदार जीवन प्रदान करून संयुक्तराष्ट्र मानवी हक्क समित्याच्या नियमावलीत सांगितल्याप्रमाणे कामाचा मोबदला, मूळ गरजा,कामाविषयीचे समाधान व सुरक्षित कार्य विषयक परिस्थिती जुळवून आणावी.
शेती पध्दतीचा सामाजिक व पारिस्थितीक परिणामांचा योग्य विचार करणे.
नूतनीकरण करण्यायोग्य उपलब्ध मालापासून वेगवेगळ्या नाशवंत वस्तू तयार करणॆ.

Subscribe to:
Posts (Atom)