Wednesday, June 29, 2011

श्रमि श्रमला श्रीरंग....!

FACEBOOK POST BY SANJAYSINH GAMBHIR
 भक्ती-सेवा सप्ताहाच्या `वो सात दिन` भावनेतून कोणीही पुण्यातील श्रद्धावान बाहेर आलेले नव्हते किंबहुना कोणालाच बाहेर पडायचेच नव्हते. अशा स्थितीत `गोविद्यापीठम` सेवा जाहीर झाली.कितीजण सेवेला येतील कोणीही अंदाज बांधू शकत नव्हतं..आपण सामान्यच,कारण `त्याचा` अंदाज कोणाला असणार ? `त्याचा` अंदाजच निराला हेच खरं ...कारण इतिहास घडवला `त्यानं`..! तब्बल आठ  बसेस,खाजगी वाहने आणि रेल्वे असं मिळून जवळपास 500 भक्त-कार्यकर्ते सेवेस उपस्थित...!
नुकताच झालेला भक्ती-सेवा सप्ताह आता mega सेवांचीच सवय करून गेलाय की काय ?
गोविद्यापिठमच्या प्रांगणात प्रवेश केला आणि जाणवू लागलं ते बापू. नंदाई अन सुचितदादाचं अस्तित्व...अगदी ठळकपणे !   स्वप्नीलसिंहांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि थोड्याच वेळात सेवाकार्य सुरु झालं..
अनावश्यक तण काढण्यापासून बंधारा बांधण्यापर्यंत विविध प्रकारच्या सेवांचा समावेश या सेवाकार्यात करण्यात आला होता.  
वय वर्षे 5 ते 85 या वयोगटातील सर्व श्रद्धावानांनी उत्साहात आपापल्या शारीरिक कुवतीनुसार या  सेवेत सहभाग घेतला.
गोविद्यापिठमच्या प्रत्येक झाडातून,प्रत्येक पानातून आपला बापू आनंदी चेहऱ्याने सर्वांकडे पाहत होता...नेहमीसारखाच..! तो आपल्याकडे पाहतच असतो. आपण त्याला पाहतो का हे महत्वाचे...प्रत्येक सेवेत असा अनुभव येतो की कामाची सवय  नसलेल्या आम्हाला  इतकं काम करून थकवा कसा येत नाही ? याचं उत्तर एकच...बापू करितो आमुची सेवा तो आपला सर्व थकवा स्वतःकडे घेतो,तो दमतो म्हणून आम्ही विना थकवा राहतो..!हा भाव नाहीये मित्रांनो, सत्य आहे...!!  म्हणून आपण `मी सेवा केली `असे न म्हणता `हे बापुराया, मी तुझा शतशः ऋणी आहे, तू मला ही संधी  दिलीस` असं म्हणायला हवंय.  
बापूकार्यात एक फायदा असतो,मित्रांनो,आपल्या मनातील जाळी-जळमटे, शंका-कुशंका, तर्क-कुतर्क, रुसवे-फुगवे, पोकळ अहंकार या सर्वांना मूठमाती  दिली   जाते. तशी व्यवस्था बापू यंत्रणेत आहे.पण कधी ? आपण काही करतोय हा विचार येऊ दिला नाही तर.. बापू विश्वनियंता आहे,सर्वव्यापी,सर्वज्ञ आहे. तरीही आपल्या छोट्याशा चांगल्या कृतीचं त्याला खूप कौतुक आहे.  
खरं तर त्यानं कौतुक करावं असं खरंच आपण काही करू शकत नाही. भल्या-भल्या ऋषी-मुनींना हजारो वर्षे तपश्चर्या करूनही जो दुष्प्राप्य तो आम्हांस जर खरोखर काहीही न करता लाभला आहे तर आम्ही त्याला हवं तसंच वागायला हवं...!  
विश्वव्यापक तूंचि  होसी I ब्रह्मा विष्णू व्योमकेशी I
धरिला वेष तू मानुषी I  भक्तजन तारावया II 
याचं स्मरण आपण कायम ठेवायला हवं. 
आपल्या जीवनातील तण (कुविचार) आणि  ताण काढण्यापासून  ते जीवनाला मर्यादेचा बंधारा बांधण्याचं काम बापू   अखंडपणे करत आहेत. आपण चुकतच राहतो,चुका करतच राहतो, बापू मात्र आपल्यासाठी राबतच राहतो,श्रमतच राहतो ..आपल्या चुकांना क्षमा करून ! 
आपलंआता कर्तव्य आहे की  बापूंना आपल्यामुळे सदैव आनंदी ठेवणं...आपल्या रागाचा अनुराग झाला की आपल्या अरंग जीवनात पांडुरंग प्रकटविण्यासाठी    तो
अनिरुद्ध श्रीरंग समर्थ आहे....!!!