BEGINS...


भाग : १
हरी ॐ
रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशनपासून होतो. असे परम पूज्य बापूंनी त्यांच्या रामराज्याच्या प्रवचनात सांगितले. या ग्रामविकासाचे कार्य आज खूप पुढे पोहचलेले आहे आणि या प्रवासात अनेक उत्तुंग शिखरे अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ऑफ ग्रामविकासने गाठलेली आहेत. हे ग्रामविकास काय आहे ते आपण "ग्रामराज्यातून रामराज्याकडे" या मालिकेतून पाहणारच आहोत. त्याआधी परमपूज्य बापू यांनी आपल्या समस्त परिवारासह गोविद्यापिठम, कोठींबे येथे भेट देऊन आत्तापर्यंत झालेल्या कार्याची तपासणी केली व पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले...त्याचे हे फोटो..




ग्रामविकासच्या प्रकल्प अंतर्गत असणार्या "परस बाग" या विषयावर स्वप्निलसिंह आणि त्यांच्या टीमने केलेले काम पाहताना तसेच त्यांना मार्गदर्शन करताना परम पूज्य बापू. पहिल्या फोटोत परम पूज्य सुचितदादा देखील आहेत. तर दुसर्या फोटोत आलेल्या पिकाची पाहणी करताना बापू. सोबत परम पूज्य नंदाई व परम पूज्य सुचितदादा व ग्रामिण विकासची टीम.




ग्रामिण विकास अंतर्गत शिकविण्यात येणार्या "पशूपालन" या विषयात अंतर्भूत करण्यात आलेल्या शेळीच्या आरोग्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना परम पूज्य अनिरुद्ध बापू. त्या सोबत शेळींची स्वच्छता आणि सुदृढ आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.

"वनराई बंधारा"..पाणी अडवा पाणी जिरवा..या ब्रीदाचे प्रात्याक्षिक पाहण्यासाठी परम पूज्य बापू, परम पूज्य नंदाई आणि परम पूज्य सुचितदादांसमवेत जात आहेत. समोरच वाळू, माती आणि गोण्यांच्या साहय्याने बाधलेला वनराई बंधारा दिसत आहे.

ग्रामीण विकासमधील आणखीन एक महत्त्वाचा आणि पाण्याची टंचाईला सामोरे जाणार्या शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे "शेततळ". कोठींबे येथे निर्माण केलेल्या शेततळ्याची पाहणी करताना परमपूज्य बापू आपल्या समस्त परिवारासह.


शेळ्यांच्या लेंड्यांपासून उत्तम लेंडी खत तयार करण्यात येते. हेच समजवून सांगताना परम पूज्य बापू त्यांच्या समस्त परिवारासह. स्वप्निलसिंह आणि त्यांच्या ग्रामिण विकास टीमने घेतलेल्या मेहनतीवर कौतुकाचा पाऊस आणि पुढील कार्यासाठी अमूल्य असे मार्गदर्शन बापूंनी केले.

ग्रामीण विकासमध्ये असलेला "चारा वैरण पिके" या विषयावर बापू आणि स्वप्निलसिंह यांच्यामध्ये चाललेला मुक्त संवाद. गुरांसाठी लागणारा चार्याचा तुटवडा पडू नये यासाठी चारावैरण विषय शेतकर्यांना शिकविण्यात येणार आहे.

फळबागांसाठी लावण्यात येणार्या वृक्षांच्या त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात संरक्षण मिळावे यासाठी "टोपी" कशी तयार करावी याचे मार्गदर्शन करताना बापू व सुचितदादा. मागे या बांबू पासून तयार केलेल्या टोप्या दिसत आहेत.
अरे हे बघ!! झोपलेय..आईच्या कुशीत गेल की बाळ पटकन झोपत.आणि बाबांच्या कुशीत चळवळ मस्ती सुरु....हो की नाही...असच चित्र इथे दिसतय..आपल्या गालाने या शेळीच्या पिल्लाला कुरवाळताना बापू आणि आई. बापू म्हणत होते यांना अस कुरवाळलेल फार आवडत. यासारख विलोभनिय दृश्य नाही...सकल प्रेमभाव तो हाच अस वाटत.

.
हरी ॐ