FACEBOOK NOTE BY :Swapnil Dattopadhye
अनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकासचा अजून एक यशस्वी प्रयोग. AIGV अंर्तगत गोविद्यापीठम येथील आब्यांच्या झाडांवर आपण वर्षभर सेंद्रीय पध्दतीने प्रयोग केले. फक्त शेणखत, गांडूळखत, जीवामृत व नीमार्कं यांची फवारणी करून आपण नुसताच आंब्याला मोहोर आणला नाही तर खूप चांगले आंबे देखिल मिळवले.
खरतर यावर्षी सर्वच ठिकाणी हवामानाच्या बदलामुळे आंब्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे ह्या हंगामात आंबा तयारच झाला नाही. शेतकरी देखिल ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदील झाले.
पण आपल्या गोविद्यापीठम येथे मात्र बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या AIGV मार्फत जे विविध प्रयोग करण्यात येत आहेत त्यामध्ये या आंब्याच्या झाडाचा देखिल समावेश होता. हवामानाच्या बदलांचा परिणाम आपल्या येथेही झाला. परंतू आपण सेंद्रीय पध्दतीने केलेल्या आंबा व्यवस्थापनामध्ये इतर शेतकर्यांच्या तुलनेत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आंबा आला. व सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही रासायनिक खते व किटकनाशकांच्या वापराशिवाया तयार झालेला हा विषमुक्त व दर्जेदार आंबा आहे. आज Organically produced mango म्हणून याची खूप जास्त किंमत शेतकरी मिळवू शकतो.
विशेष महत्वाचे म्हणजे AIGV चे प्रयोग सुरु होण्यापूर्वी मागच्या वर्षी फक्त ७०० आंबे मिळाले होते. त्याच्या तुलनेत या वर्षी आपल्याला २५०० आंबे मिळाले. व अजुनही अनेक आंबे झाडावर आहेत. सेंद्राय पध्दतीने शेती करण्याचे काय फायदे आहेत ह्यासाठी याहून दुसरे चांगले उदाहरण सापडणार नाही.
हरि ओम
No comments:
Post a Comment